श्रम संस्कार छावणीसाठी आलेल्या शिबीरार्थ्यांचे केले स्वागत

शिबीरार्थ्यांना शुभेच्छा देत केले शिबीरस्थळी रवाना

मूल (प्रतिनिधी): जेष्ट समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या संकल्पनेतुन 1968 पासुन अविरत सुरू असलेल्या श्रम संस्कार छावणीसाठी परजिल्हयातील आलेल्या शिबीरार्थ्यांचे मूलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करीत त्यांना बसण्याची व सरबतची व्यवस्था केली, आणि आलेल्या शिबीरार्थ्यांना शुभेच्छा देत शिबीरास्थळी रवाना केले.

मूल तालुक्यातील मौजा सोमनाथ आमटे फार्म येथे दरवर्षी 15 मे ते 22 मे पर्यंत आंतर भारती – भारत जोडो या अभियानाअंतर्गत श्रमसंस्कार छावणी शिबीर आयोजित केल्या जाते, दिवंगत बाबा आमटे यांनी हे शिबीर सुरू केले होते, ओडीसा, गुजरात सह महाराष्ट्रातील सुमारे 34 जिल्हयातील जवळपास 400 शिबीरार्थ याशिबीरात सहभागी होणार आहेत.

कोरोना संक्रमणामुळे मागील दोन वर्षांपासून सदर शिबीरात खंड पडलेला होते, या वर्षी हे शिबीर घेण्यात येत आहे, शनिवारी सकाळपासून शिबिरात हजेरी लावण्यासाठी महिला व पुरुष शिबिरार्थी सोमनाथ येथे जाण्यासाठी मूल येथील बस स्थानकावर पोहचत होते, सदर शिबिरार्थ्यांना दिलासा देण्यासाठी येथील बस स्थानका समोरील गोगुलवार कॉम्प्लेक्स मध्ये बसण्याची व्यवस्थेसोबतच थंडी पाणी, शरबत, बिस्कीट, चहा ची व्यवस्था केली होती. नोंदणी केलेल्या शिबीरार्थ्यांना सदर स्थळी दाखल होण्याचे सांगण्यात आल्याने शिबीरार्थी पोहतच होते.

शिबीरात दाखल होण्यासाठी आलेल्या शिबीरार्थ्यांचे मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते इंजि. किशोर कापगते, दिनेश हेडाऊ, किशोर गोगुलवार यांनी स्वागत करीत शुभेच्छा देत शिबीर स्थळी पाठविण्यात आले.

दोन वर्षाच्या कालावध्ीा नंतर मूल शहरात दाखल झालेल्या शिबीरार्थ्यानी मूल शहराचा कायापालट झाल्याचे यावेळी बोलुन दाखविले.