3 महिण्यापासुन खड्डयाचे खोदकाम
मूल (प्रतिनिधी) : पाणी अडवा, पाणी जिरवा, या संकल्पनेवर आधारीत, घरातील सांडपाणी शोषखड्यात सोडून, सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी जानाळा ग्राम पंचायती अंतर्गत फुलझरी व आगडी येथे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शोषखड्डे तयार करण्यासाठी घरोघरी 3 महिण्यापुर्वी खड्डे खोदुन ठेवले, मात्र ते पूर्ण होण्यांच्या आधीच शोषखड्यासाठी खोदलेले खड्डे निकामी झाले असून, हे खड्डे खोदणाऱ्या मजूरांचे पैसेही संबधीत विभागाने अजूनपर्यंत दिले नसल्यांचे या मजूरांनी आमचे प्रतिनिधीस सांगीतले.
मिळालेल्या माहितीनुसार, मूल पंचायत समिती येथे पूर्णवेळ कार्यरत एका कर्मचाऱ्यानीच या शोषखड्याच्या कामाचा कंत्राट घेतला आहे. मागील अनेक महिण्यापासून हा कर्मचारी, भलत्याचाच नावाने ठेकेदारी करीत आहे. पंचायत समितीचे संबधीत कर्मचारीच ठेकेदार झाल्यांने, त्यांचे अधिनस्थ असलेले ग्रामसेवकही यात आपले हात धुत असल्यांचे दिसून येत आहे.
एका शोषखड्यासाठी 2900 रूपयेचा अंदाजपत्रक बनविण्यात आलेला आहे. हे काम स्वतः कुटुंबियाना करायचे आहे मात्र ग्राम पंचायतीने हे काम गावातील मजूरांकडून करवून घेत असून, मजूराला एक खड्डा खोदणे, खड्डा प्लॉस्टिकचे टाकीत रेती, दगड माती टाकूण भरणे याकरीता 350 रूपये कबूल केले आहे. आगडी येथे एकूण 50 खड्डे खोदले आहेत. मागील तीन महिण्यापासून केवळ खड्डे खोदून ठेवले असून, पुढे ते बुजविण्यांचे कामच न झाल्यांने, या खड्यात दुर्गंधी पसरली आहे. आरोग्याच्या कारणावरून अनेकांनी खड्डेही बुजवून टाकले आहेत. काहीच्या कोंबळया या खड्यात पडून मेल्यांने, अनेकांनी ही बिमारीच नको, म्हणत खड्डे बुजवून टाकले आहे. गावातील काम करणारे मजूर, मजूरीकरीता त्रस्त आहेत.
350 रूपये मजूरी आणि 400 रूपयाची प्लॉस्टिक टाकी असे केवळ एका खड्यामागे 750 रूपये खर्चुन उर्वरित लाखो रूपये कोण आपल्या घशात घालणार आहे? याची चर्चा आता रंगू लागली आहे. जी कहानी आगडीची आहे, तीच कहाणी फुलझरी गावाचीही असल्यांची माहिती पुढे येवु लागली आहे. पावसाळा तोंडावर असून, आधिच अर्धे खड्डे गावकऱ्यांनी बुजविले असतांना, उर्वरित खड्यातही पावसाचे पाणी जावून ते निकामी होण्यांची भिती आहे. पंचायत समिती आणि ग्राम पंचायतच्या मिलीजुली प्रकारामुळे शोषखड्यासारख्या चांगल्या उपक्रमांचे तीनतेरा वाजत आहे.
जानाळा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक धिरजकुमार बोरकर यांचेशी याबाबत बातचित केली असता, त्यांनी सदर काम ग्राम पंचायत मार्फत सुरू असुन स्वतः लाभार्थी खड्डयाचे खोदकाम करीत असल्याचे सांगीतले.