श्रीकृष्ण व्हाट्सअप ग्रुपवर झाली होती चर्चा
मूल (प्रतिनिधी) : सोशल मिडीया हे चर्चेचे आणि समस्या सोडविण्याचे माध्यम झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशीच एक चर्चा मूल येथील श्रीकृष्ण व्हाटसअप ग्रुपवर झाली आणि त्याची दखल क्षेत्राचे आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली, व आठवडाभरात त्यांनी बस स्थानकावरील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बोरवेल मंजूर केले.
बस स्थानक हे गर्दीचे ठिकाण मात्र अशाही ठिकाणी पाण्यासाठी प्रवाश्यासह, रोजीरोटी करून छोटे व्यवसाय करणाऱ्याना पाण्यासाठी वणवण भटकण्यची पाळी आली होती, सदर गंभीर बाब मूल येथील प्रसिध्द असलेल्या श्रीकृष्ण व्हाटसअप ग्रृपवर चर्चेला सुरूवात झाली, सदर ग्रुप सदस्यांनी करोडो रूपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या बस स्थानकावर पाण्याची सोय नसल्याचा उल्लेख केला, यावरून ग्रुप ऍडमिन तथा नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी स्विकृत नगरसेवक चंद्रकांत आष्टणकर यांनी बस स्थानकावर जाऊन पाणी समस्यावर चौकशी केली, चौकशीमध्ये तथ्य आढळुन आल्याने सदर बाब क्षेत्राचे आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणुन दिली, विषयाचे गांभीर्य लक्षात घेवुन आमदार मुनगंटीवार यांनी स्थानिक विकास निधीमधुन निधी मंजुर करून दिली, व अवघ्या 8 दिवसात मूल येथील बस स्थानकावर बोरवेलचे खोदकामही करण्यात आले.
यावेळी नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी स्विकृत नगरसेवक चंद्रकांत आष्टणकर, श्रीकृष्ण व्हाटसअप ग्रुपचे अॅडमिन इंजि. किशोर कापगते,, ओबीसी नेते राकेश ठाकरे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष प्रशांत बोबाटे उपस्थित होते.
श्रीकृष्ण व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातुन झालेल्या चर्चेतुन तात्काळ समस्या निकाली काढल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नागरीकांनी आभार मानले.