अन्यथा गौव सेवा मानव सेवा महाराष्ट्र करणार आंदोलन
गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्हातील कमलापुर हत्ती कॅम्प येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा गौव सेवा व मानव सेवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष रक्षमवार यांनी दिला आहे.
गडचिरोली जिल्हयातील कमलापुर येथील हत्ती कॅम्प हे प्रमुख आकर्षनाचा बिंदु आहे. केवळ गडचिरोली जिल्हयातीलच नव्हे तर चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपुर पासुन ते तेलंगना राज्यातील विविध पर्यटक नैसर्गिक अधिवासात हत्ती बघण्याकरीता कमलापुर हत्ती कॅम्प येथे दरवर्षी येतात.
गडचिरोली जिल्हा 76 टक्के वनाने व्यापलेला असल्याने विविध प्रकार ची झाडे, वन औषधी, वनस्पती, प्राणी, पक्षी आढळुन येतात व निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी फक्त आपल्या गडचिरोली जिल्हयातीलच नाही तर राज्यातील विविध भागातुन व इतर राज्यातून सुध्दा पर्यटन स्थळ म्हणुन कमलापुर हत्ती कैम्प ला भेट देतात.
दरवर्षी पर्यटकांची कमलापुर हत्ती कॅम्प ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असतांना कमलापुर येथील हत्ती व ताडोबा मधील हत्ती गुजरात राज्यात स्थलांतरीत करणे हे एक प्रकारे हत्ती या प्राण्यावर अन्याय करण्यासारखे आहे.
ज्यामुळे पर्यटनास येणाऱ्या असंख्य पर्यटकांचा तसेच वन्यजीव प्रेमींचा नावारुपास आलेल्या कमलापुर हत्ती कॅम्पमध्ये भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होऊन पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते. राज्यातील एकमेव असलेल्या कमलापुर येथील हत्तींची गुजरात राज्यामध्ये स्थलांतरणाची प्रक्रीया लवकरात लवकर थांबवावी व कमलापुर हत्ती कॅम्प मधील हत्तींना योग्य न्याय देण्यात यावा. नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रक्षमवार यांनी दिला आहे.