शेतिच्या मालाचे दोन लाख चोरी गेल्याची केली होती तक्रार : संशयितांना अभय
पत्रकार परिषदेत माहिती
अतुल कोल्हे भद्रावती
घरी झालेल्या चोरी बाबास संशयी तांना पाठीशी घालत असून मला आणि माझ्या मुलाला ही चोरी बनावट असल्याचे म्हणून कुणाच्यातरी कर्जाचे पैसे देण्याच्या असल्यामुळे रचलेला डाव आहे असा चुकीचा तर्क पोलिसांनी काढून हा चोरीचा गुन्हा कबूल कर असे मनत माझ्याच मुलाला पोलिसांनी बदडले असल्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तक्रारदार विनोद ठेंगणे यांचे नाव असून ओम ठेगणे असे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून भद्रावती पोलिसांच्या अन्यायाची माहिती देणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. गौतम नगर येथे आपले घर असून शेतातील ६१ पोते चना वरोरा येथील रवीकमल कॉटन जिनींग यांना १४ मे रोजी विकला त्याच्या माध्यमातून २ लाख २८ हजार रुपये मिळाले त्यातील २२ हजार रुपये मजुरी आणि ट्रान्सपोर्ट ला दिले ६ हजारआणि इतर चिल्लर त्यांच्या खिशात ठेवले उर्वरित पाचशे रुपयाची चार बंडल असे दोन लाख रुपये घरातील पलंगावर ठेवले माझी पत्नी आणि लहान मुलगी हे वरोरा येथील नातेवाईकाकडे आधीच लग्नाला गेले त्यामुळे घरी मी आणि ओम नावाचा मुलगा होतो आम्ही जेवण करून झोपी गेलो दरम्यान कुलरची हवा बाहेर जाण्याकरता खिडकी उघडी ठेवली त्याचा फायदा घेऊन येतीलच कोणी शेजाऱ्यांनी या खिडकीतून हात टाकून दोन लाख रुपये चोरल्याची संशय ठेगणे यांनी पोलिसांना सांगितले खिडकी खाली जमीनीवर चपलेच्या च्या खुणा आहे पोलिसांनी चौकशी करून फोटो काढले नाही तसेच श्वानपथकाला सुद्धा पाचारण केले नाही संशयितांची थातूरमातूर चौकशी करून या चोरीबाबत मला आणि माझ्या मुलाला त्रास देत आहे माझा मुलगा दहाव्या वर्गात असल्याने पोलिसांच्या त्रासापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे शेतीचा हंगाम सुरू झाल्याने बियाण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न भेडसावत आहे असे असताना पोलीस त्यात मुलाला मारहाण करून अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे .याबाबत आपण जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून लिखित तक्रार करण्य करणार असल्याचे यांनी पत्रपरिषदेत सांगितले यावेळी अनिल मोडक उपस्थित होते
गोपाल भारती ठाणेदार भद्रावती ठेंगणे यांचे दोन लाख चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. या घटनेचा तपास करीत असताना त्या बेडवरील दोन लाख रुपयाचे बंडल चे फोटो चोरी पूर्वी फिर्यादीच्या मुलाने व्हाट्सअप वर आईला व इतरत्र व्हायरल केले त्यामुळे हि चोरी कोणी केली हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले.