प्रेम प्रकरणातुन युवकाने केला प्रेयसीवर चाकुहल्ला

लग्नास नकार दिल्याने केला हल्ला : गुन्हा दाखल

चंद्रपूर (प्रतिनिधी) : माणिकगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या प्रियकर आणि प्रेयसीमध्ये लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकुहल्ला करून स्ततःचा हातावर चाकुने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

गडचांदूर येथील 21 वर्षीय युवक आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन किल्ल्यावर आला होता. सदर युवकाने प्रेयसीकडे लग्नाची मागणी केली. परंतु प्रेयसीने प्रियकराला ला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकर ने रागाच्या भरात युवतीच्या गळ्यावर चाकूहल्ला केला.व नंतर स्वतः च्या हातावर चाकूहल्ला करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
किल्ल्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकानी रक्ताने माखलेल्या युवक व युवतीला बघताच त्यांनी तेथील वनमजूराला बोलावून त्याच्या साहाय्याने किल्ल्यावरून दोघांनाही खाली उतरविले व जिवती पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेत असलेल्या दोघांनाही गडचांदूर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते. जिवती पोलिसांनी भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.