ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर भाजपाचा मंत्रालयावर मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसीच राजकीय आरक्षण टिकुण राहिलं पाहिजे यासाठी भाजपाने मंत्रालयावर काढलेल्या मोर्च्याच्या विरोधात मुंबई पोलीसांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे यासह विविध मागण्या पुढे करीत भाजनाने, भाजपाच्या मुख्य कार्यालयापासुन मंत्रालयावर मोर्चा काढला होता, दरम्यान मोर्चा पुढे जात असताना आमदार मुनगंटीवार व भाजपाच्या काही आंदोलन करणाऱ्या काही नेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.