धारदार शस्त्राने युवकाची हत्या

एका संशयिताला घेतले ताब्यात

चंद्रपूर (प्रतिनिधी) : शहरातील अष्टभुजा वार्डात राहात असलेल्या एका तरूण युवकांची  धारदार शस्त्रानी हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 6 वाजता दरम्यान उघडकीस आली. सदर घटनेमुळे चंद्रपूर शहर हादरले असुन पोलीस एका शंसयिताला ताब्यात घेतले आहे. धर्मवीर यादव उर्फ डब्लु वय 22 वर्षे असे मृत्तकाचे नांव आहे.

घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळ गाठून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास रामगर पोलीस करीत आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहर हादरून गेले.