निराधार योजनेचे 108 प्रकरणे मंजुर : राकेश रत्नावार

लाभार्थ्यांना दिलासा

मूल (प्रतिनिधी) :- निराधाराना आधार मिळावा यासाठी शासनाने दरमहा निराधार व्यक्तींना योजनेचा लाभ दिल्या जातो, नविन प्रकरणे समितीच्या माध्यमातुन मंजुर केली जातात, दरम्यान गुरूवारी तहसील कार्यालयात समितचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजना समितीची सभा घेण्यात आली. यासभेत निराधार योजनेचे 108 प्रकरणे मंजुर करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी समितीचे सचिव तथा नायब तहसीलदार ठाकरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य गंगाधर कुनघाटकर, सत्यनारायण अमदुर्तीवार, नगर पालीका प्रतिनिधी भोयर, तहसील कार्यालयातील लिपीक .गीरडकर उपस्थित होते.

सभेत श्रावणबाळ योजना 29, वृध्दपकाळ योजना 53, संजयगांधी निराधार योजना 20, इंदिरा गांधी विधवा योजना 05 व इंदिरा गांधी अपंग 01 प्रकरणे मंजूर करण्यांत आले.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे अर्ज प्रलंबित राहणार नाही याद्ष्टीने समितीची नियमीत सभा घेवून अर्ज मंजूर करण्यांचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना निराधार योजनेचा फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल असून केसेस प्रलंबीत राहणार नाही यादृष्टीने समिती प्रयत्न करण्यांत येत आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या केसेसचा निपटारा करण्यांत आलेले असून चालू अर्ज सुध्दा दरमहा मिटींग आयोजित करण्यांत येऊन मंजूर करण्यांत येत आहे. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे.याऊपरही काही अडचण असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केले आहे.