बस अपघातात महिला ठार

मूल बस स्थानकावरील घटना
मूल (प्रतिनिधी) : गडचिरोली येथे जाण्यासाठी मूल बस स्थानकावर आलेल्या कुटुंबियांपैकी एका महिलेला बसची धडक बसल्याने ती ठार झाल्याची घटना मूल येथील बस स्थानकावर रविवारी 1.30 वाजता दरम्यान घडली. सरिता मनोज कररेवार वय 26 वर्ष रा. मारोडा असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवाशी  मनोज करर्रेवार हा आपल्या कुटूंबासह गडचिरोली येथे जाण्याासाठी रविवारी मूल बस स्थानकावर आले होते. दरम्यान सरिता मनोज कर्रेवार वय .26 वर्षे हि बस क्र. एम एच 40 एन 895 ही चंद्रपूर ला जाणारी बस कुठे जाणार आहे म्हणून बसच्या समोर जाऊन बघत असताना बसने तिला धडक दिल्याने ती ठार झाली.
सदर घटनास्थळाचा मुल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
येथील बस स्थानकावर काही महिन्यापूर्वी बस अपघातात महिला ठार झाल्याची घटना घडली, त्यानंतर एका यांत्रिकाच्या अंगावरून बस गेल्याने ठार झाल्याची घटना ताजी असताना आज एका महिलेचा बस अपघातात ठार झाल्याने  मूलचे बस स्थानक अपघाताचे स्थळ बनले तर नाही नाही अशी चर्चा रंगु लागली आहे. सदर अपघातामुळे मारोडा येथे शोककळा पसरलेला आहे.