हायव्हा धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती पुलाजवळील घटना

बल्लारपूर (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील हडस्ती येथील शेतकरी म्हैस घरी आल्या नाही म्हणून वर्धा नदीकडे दुचाकीने शोधार्थ गेला. म्हैसीच्या शोध घेत असताना त्याच्या दुचाकीला हायव्हा ट्रक ने जबरदस्त धडक दिली. या धडकीत तो जबर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील कढोली – हडस्ती वर्धा नदीच्या पुलाजवळ घडली. राजू देवराव थिपे ( ४८ ) रा. हडस्ती ता. बल्लारपूर असे अपघातात मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

हडस्ती येथील शेतकरी राजू थिपे शेती सोबत जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे म्हशी होत्या. सायंकाळ होऊन देखील म्हशी घरी आल्या नाही, म्हणून तो दुचाकी क्रमांक एम. एच.-३४:S-०७८८ ने वर्धा नदी कडे म्हशीच्या शोधार्थ गेला. तो म्हशीचा शोध घेत असताना भरधाव हायव्हाने क्रमांक एम. एच.३४- बी. जी.:२११६ ने राजूच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही वार्ता हडस्ती गावात पसरली. गावाकऱ्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात हलविले. मात्र रक्तश्त्राव मोठया प्रमाणात झाल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी हायव्हा ट्रक चालकाला चंद्रपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेआहे. चंद्रपूर शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. हायव्हा ट्रक चालकाच्या हयगयीने राजू थिपे यांचा नाहक बळी गेला, असी भावना हडस्ती येथील नागरिकांनी व्यक्त करून हायव्हा ट्रक मालकाने नुकसान भरपाई द्यावी, म्हणून पोलीस ठाण्यात मागणी लावून धरली. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.