गादीवाल्याकडे काम करणाऱ्या फिरोजभाईचा मृत्तदेह आढळल्याने खळबळ

मूल येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : येथील इंदिरानगरातील रहीवासी असलेल्या एका इसमाचे गोगीरवार आणि आंबटकर यांच्या खुल्या जागेवर मृत्तदेह आढळुन आल्याने मूल शहरात खळबळ उडाली आहे. फिरोजभाई वय 45 वर्षे असे मृत्तदेह आढळुन आलेल्या इसमाचे नांव आहे.

मूल येथील बाबा गादीवाला यांच्याकडे मागील अनेक वर्षापासुन काम करणारे फिरोजभाई वय 45 वर्षे यांचा मृतदेह आज मूल येथे आढळून आला आहे. तो मूल येथील इंदिरानगर वार्डात राहत होते. या वार्डाला लागूनच असलेले गोगीवार आंबकर यांचे खुल्या जागेवरील कंपाउंड जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून मूल पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास सुरू केला, असता सदर मृतदेह फिरोजभाई यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

सदर मृतकाचे पार्थिकाची परिस्थिती पाहता दोन ते तीन दिवस पूर्वी फिरोजभाई चा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा करीत आहे.