Home Breaking News विवाहीत अभियंत्याने केली आत्महत्या

विवाहीत अभियंत्याने केली आत्महत्या

सिलिंग फॅनला लागला गळफास

घुग्घूस (प्रतिनिधी) :  येथील वेकोली वसाहतीत राहणाऱ्या एका कर्मचाऱ्यांचा अभियंता असलेल्या विवाहित मुलाने सिलिंग फॅन ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. विकास पेंडोटा वय 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

घुग्घृस येथील गांधी नगर वेकोलीच्या वसाहतीत राहणारे वेकोली कर्मचारी रमणय्या पेंडोटा यांचा मुलगा विकास वर्धन्य रमणय्या पेंडोटा (28) वर्ष  याने शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तो विवाहीत असून त्यांनी अभियंताचे शिक्षण घेतले असून तो नौकरी करीत असल्याचे सांगितले जाते मात्र आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहे.
error: Content is protected !!