नगर परिषद व नगर पंचायत आरक्षण सोडतीबाबत हरकती व सूचना आमंत्रित

चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्घूस व नागभिड  या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने सोमवार दि. 13 जून 2022 रोजी निश्चित केले आहे.

सदर आरक्षण सोडतीबाबत हरकती व सूचना बुधवार, दि. 15 जून ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंतच्या कालावधीत संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयात मागविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.