विज पडुन तिन चितळ ठार

वनविभागाने केला पंचनामा

सिंदेवाही (प्रतिनिधी) : वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या मरेगांव तुकुम येथे विज पडुन तिन चितळ ठार झाल्याची घटना 17 जुन रोजी रात्रौच्या सुमारास घडली.

सिंदेवाही वनपरिक्षेञातील मरेगाव ;तुकुम येथील तलाव परिसरात अंदाजे रात्रो १२ वाजता च्या सुमारास विज पडली त्यात तीन चितळ जागीच ठार झाले. १८ जून च्या सकाळी मृत अवस्थेत तीन चीतळ काही नागरिकांना दिसुन आले. सदर माहिती माजी सरपंच सहारे यांना दिली, श्री. सहारे यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली  त्या आधारे वनविभागाने घटनेच्या ठिकाणी जावुन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत्त चीतळ हे मादी जातीचे असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.

घटनास्थळावर वनपरिक्षेत्राधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहायक बुराडे, वनरक्षक गेडाम, सिंदेवाहीच्या पशुवैद्यकीय अधिकारी पूजा हिवरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here