प्रदुषणमुक्तीसाठी माल धक्का वाहतुक स्थलांतरीत करा : मार्निग ग्रुपची मागणी

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

मूल (प्रतिनिधी) : दैनदिन कामाच्या व्यवस्थेतुन निघुन मनाची शांती व आरोग्याची जोपासना करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रिडा कौशल्याची तयारी करण्यासठी मूल येथे कर्मवीर महाविद्यालयाचे एकमेव पटांगण आहे मात्र काही दिवसांपासुन रेल्वे प्रशासनाने मूल येथील रेल्वे परिसरात माल धक्काचे काम सुरू केले आहे, सदर माल धक्काच्या वाहतुकीचे स्थलांतरण करून भविष्यात मूल येथील नागरीकांवर भेडसावणारे प्रदुषण रोखण्यात यावे अशी मागणी मूल येथील मार्निग ग्रुपच्या वतिने मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर-मूल-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहणांची रेलचेल होत असते, अतिशय वर्दळीचे मार्ग असल्याने रेल्वे प्रशासनानेही मूल येथील रेल्वे स्टेशन परिसरात माल धक्का तयार करण्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू केलेले आहे. या परिसरात कर्मविर महाविद्यालयाचे पटांगण असुन याठिकाणी आरोग्यासाठी शुध्द ऑक्सीजन मिळण्याचे एकमेव ठिकाण असल्याने यापरिसरात माल धक्काचे काम सुर्रू झाल्यास हे ठिकाणही प्रदुषणाचे माहेरघर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही, मूल नगर पालीकेने शहर स्वच्छ स्पर्धेत सहभाग घेत देशात शहर सौंदयीकरण स्वच्छता अभियानात तिसÚया क्रमाकाचे पुरस्कार मिळवुन देशात मूल शहराचे नांव सुवर्ण अक्षराने रोवण्यात आले असताना, माल धक्काचे काम मूल शहराच्या जवळील रेल्वे स्टेशन परिसरात सुरू केल्यास प्रदुषणामध्ये मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मविर महाविद्यालयाच्या क्रिडागंणाला लागुन वनविभागाचे मोठे जंगल असुन यापरिसातुन नंेहमीचे वन्यप्राण्याचा वावर असते यामुळे वन्यप्राण्यासाठी ही हे धोक्याचे रहु शकते.

रेल्वे प्रशासनाने माल धक्का वाहतुक हे महाविद्यालयाीन क्रिडा तसेच मूल शहराच्या बाहेरून घेतल्या नागरीकांना अडणची जाणार नाही यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणीही मूल माॅिर्नग गु्र्रपच्या वतिने राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे. निवेदन देताना मॉर्निग गु्रपचे हिरेन शहा, जिवन कोंतमवार, दिनेश गोयल, राकेश रत्नावार, नितीन येरोजवार, प्रशांत समर्थ, विजय केशवानी, गिरीश केशवानी, राहुन येनप्रेड्डीवार, अमोल बच्चुवार, अविनाश गरपल्लीवार, चंदु मारगोनवार, अरूण आत्राम, महेश गाजुलवार, डॉ. दिनेश वÚहाडे, अरविंद गिरी, सुरेश फुलझेले, अॅड. अश्वीन पॉलीकर, किशोर गोगुलवार, लवनिश उधवानी प्रशांत लाडवे, रूपेश मारकवार, सचिन चिंतावार, संतोष पालांदुरक, संजय भुसार, श्रीकांत बुक्कावार, नरेा बोम्मनवार, साई चिमडयालवार, गौतम विश्वास, संदीप मोहबे, निलेश राय, संजय येरोजवार, विनोद निमगडे, राजु झोडे, राकेश ठाकरे, अमीत राउत उपस्थित होते.