मूल-चांदापूर मार्गावर अपघात Accident

मूल (प्रतिनिधी) : पोंभुर्णा येथुन मूल मार्गे चांदापूर येथे जात असताना मूल चांदली नदी जवळ अपघात होवुन एक जण जखमी झाल्याची घटनी मंगळवारी दुपारी 4.30 वाजता दरम्यान घडली. नंदकिशोर श्यामराव लेंनगुरे वय 45 वर्षे रा. चांदापूर असे अपघातात जखमी झालेल्या इसमाचे नांव आहे. Accident on Mul-Chandapur road

मूल तालुक्यातील चांदापूर येथील नंदकिशोर श्यामराव लेनगुरे हे नवेगांव मोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असल्याचे समजते. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.