माल धक्काचे काम तात्काळ बंद करून स्थलांतरीत करा : मार्निग ग्रुपची मागणी

अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारणार

मूल (प्रतिनिधी) : सुमारे दिडशे वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मूल रेल्वे स्टेशन परिसरातील माल धक्काचे काम थांबवुन आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी माल धक्काचे स्थलांतरीत करण्याची मागणी मूल येथील मार्निग ग्रुपच्या वतिने करण्यात आली असुन रेल्वे प्रशासनाने काम बंद करून स्थलांतरीत न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबु अशा इशारा मार्निंग ग्रुपच्या वतिने आयोजीत पत्रकार परिषदेत दिला आहे. Immediately stop the loading work and relocate

येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत मार्निग ग्रुपचे सदस्य जिवन कोंतमवार, ऍड.. अश्वीन पॉलीकर, हिरेन गोगरी म्हणाले की, मूलच्या नागरीकांना फिरायला जाण्यासाठी कर्मविर महाविद्यालयाचे एकमेव पटांगण आहे, सदर पटांगणाला लागुन प्रादेशिक, वनविकास महामंडळ आणि बफर क्षेत्राचे मोठे जंगल असुन यापरिसरामधून वन्यप्राण्याची मोठया प्रमाणात रेलचेल असते, असे असतानाही रेल्वे प्रशासनाने कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणाला लागुन असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या जागेवर माल धक्काचे काम जलद गतीने सुरू केलेले आहे, सदर काम पुर्ण होवुन माल धक्का सुरू झाल्न्यास मुलच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, सदर माल धक्का सुरू झाल्यानंतर मानवी जिवनास अतिशय धोकादायाल असलेल्या कच्चा लोहामध्ये मिसळलेले कार्बन, मॅगनिज, फॉस्फरस, गंधक, सिलीकॉन आणि लोह यामुळे कार्बन मोनाक्साईड शुध्द वातावरणात मिळसुन श्वसन क्रिया होण्यास ऑक्सीजनची मात्रा कमी होईल आणि शरीरातील मस्तीक तंत्रिका उतक व हदय ठोके काम करणे बंद करू शकतो यामुळे मूल शहराला लागुन असलेल्या माल धक्काचे ठिकाण स्थलातंरीत करणे गरजे असल्याचे त्यांनी सांगीतले.

याबाबत रेल्वे प्रशासनाचे नागपूर येथील पबंधक मलिद्र उप्पल यांना भेटुन माल धक्का स्थलातंरणाबाबत चर्चा केली मात्र त्यांनीही पाहिजे तसा सकारात्मक चर्चा केली नाही, यामुळे भविष्यात उद्भभवणाऱ्या आरोग्याची समस्या कायम दुर करण्यासाठी मूलच्या नागरीकांनी पुढाकार घेणे गरजचे असल्याचेही पत्रकार परिषदेत मार्निग गु्रपच्या सदस्यांनी आवाहन केले. यावेळी मार्निग ग्रुपचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.