ट्रॅव्हल्स पलटुन झालेल्या अपघात 3 गंभीर जखमी

मूल-चामोर्शी मार्गावरील योग राईस मिल जवळील घटना

मूल (प्रतिनिधी) : चामोर्शी ते नागपूर खाजगी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 3 जण गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मूल-चामोर्शी मार्गावरील योग राईस मिल जवळ सकाळी 7.30 वाजता दरम्यान घडली.

तालुक्यातुन मोठया प्रमाणावर खाजगी प्रवासी वाहतुक होत आहे, दरम्यान चामोर्शी वरून मूल मार्गे नागपूर खाजगी प्रवासी वाहतुक करीत असलेल्या श्री. बाबा ट्रॅव्हल्स क्रं. एम एच 14 सी डब्लु 1982 च्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात मूल जवळुन 5 किमी अंतरावर झालेला आहे,

सदर वाहनमधून 12  प्रवासी वाहतूक करीत असल्याचे बोलले जात असून त्यापैकी 3 जण गंभीर जखमी झाले. नागरीक आणि मूल पोलीस जखमीना मूल उपजिल्हा रूग्णालयात पोहचविण्यासाठी मदत करीत आहे, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.