फुलझरी येथील वनरक्षकाच्या दुचाकीला हायवाची धडक

पती-पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर वरून फुलझरी येथे दुचाकी जात असताना केसलाघाट जवळ झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. Accident नंदकिशोर चनकापूरे Forester वय 32 वर्षे व निकीता चनकापुरे वय 26 वर्षे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नावं आहे.

मूल तालुक्यातील बफरझोन क्षेत्र असलेल्या मौजा फुलझरी येथील वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले नंदकिशोर चकनापुरे वय 32 वर्षे हे पत्नी निकीता चकनापुरे यांना घेवुन चंद्रपूर येथे गेले होते, Severe injury to husband and wife’s leg काम आटोपुन दुचाकीने फुलझरी येथे परत येत असताना केसलाघाट जवळ हायवा क्रं. सी जी 04 एल एक्स 2546 ने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झालेले आहे. सदर जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.