रानटी डुक्कराचा शेतकऱ्यावर हल्ला

शेतकरी गंभीर जखमी: मूल तालुक्यातील चिखली येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : शेतातील काम आटोपुन घरी परत येत असताना शेतात असलेल्या रानटी डुक्करांने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा चिखली येथे आज (ता. 4 जुर्ले) रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान घडली. डेमाजी रामजी चुधरी वय 55 वर्षे असे रानटी डुक्कराने हल्ला केलेल्या शेतकÚयाचे नांव आहे.

चिखली येथील शेतकरी डेमाजी रामजी चुधरी यांना कन्हाळगाव मार्गावर शेती आहे, सकाळी शेतात गेले होते काम आटोपून चिखली येथे परत येत असताना रानटी डुक्कराने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. सदर माहिती चिखली येथील गावकऱ्यांना  माहिती होताच गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या डेमाजी चुधरी यांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालय आणुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि चंद्रपूर हलविण्यात आले.

सदर घटनास्थळ हे सावली वनपरिक्षेत्रातील जंगलाला लागुन आहे, घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी वसंतराव कामडी, वनरक्षक धनविजय घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.