सैनिक शाळा पश्चिम विभागीय क्रीडा स्पर्धा सातारा संघ विजेता

चंद्रपूर सैनिक शाळेत पार पडल्या स्पर्धा
सहा सैनिक शाळेतील ४०२ क्रीडापटुनी घेतला भाग

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चंद्रपूर सैनिक शाळेत सैनिक शाळा पश्चिम विभागीय आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा १ ते ९ जुलै दरम्यान पार पडल्या. मिल्खासिंग क्रिडांगणावर आयोजित विविध स्पर्धेत सातारा सैनिक शाळेनी सांघिक विजेते पद पटकावले. या स्पर्धेत पश्चिम विभागातील सहा सैनिक शाळेच्या ४०२ क्रीडापटुनी सहभाग घेतला होता. शनिवारी या स्पर्धेचा शानदार समारोप झाला. फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सातारा व बाळाचडी सैनिक शाळेच्या संघा दरम्यान झाला. यात सातारा फुटबॉल संघ विजेता ठरला.

चंद्रपूर सैनिक शाळा येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरशालेय सैनिक शाळेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सैनिक शाळा सातारा, बाळाचाडी, चितोडगड, झाशी व झुनझुन सैनिक शाळेतील ४०२ क्रीडापटू सहभागी झाले होते. यावेळी १७ व १४ वयोगटातील खेळाडूसाठी फुटबॉल स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा,हॉकी स्पर्धा, हिंदी व इंग्रजी भाषेत वादविवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावत सातारा सैनिक शाळेच्या चमुनी ४८ गुणासह सांघिक विजेता ठरला.दुसऱ्या क्रमांकावर सैनिक शाळा, चितोडगड चमू आली असून गुणतालीकेत त्यांना ४६ गुण मिळाले. बाळाचडी सैनिक शाळेच्या चमुनी ४६ गुण प्राप्त करून तिसऱ्या स्थानी राहिली.२५ गुण मिळवून चंद्रपूर सैनिक शाळा चवथ्या स्थानावर राहिली.१७ गुण प्राप्त करून सैनिक शाळा झुनझुन पाचव्या स्थानावर तर सैनिक शाळा झाशी चमुनी गुणतालीकेत ११ गुण मिळवून शेवटच्या स्थानावर राहून समाधान मानावे लागले.

मिल्खासिंग क्रिडांगणावर विजेत्या संघाला चंद्रपूर सैनिक शाळेचे प्राचार्य, क्रीडा प्रशिक्षक, कमांडर व सैनिकी शिस्थित बँड पथकांच्या वाद्याच्या तालात शानदार पारितोषिक वितरण करून क्रीडा सत्राचा समारोप करण्यात आला. यावेळी सैनिक शाळेचे प्राध्यापक व शिक्षक वृंद तथा विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.