चंद्रपूरसह महत्वाच्या शहरातून ब्रॉडगेज मेट्रो सुरु करणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे होत स्वप्न

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर शहरात  सुरू झालेल्या मेट्रोचा आता लवकर विस्तार होणार असून नागपूर पासून महत्वाच्या शहराला जोडण्यासाठी लवकरचं ब्रॉडगेज मेट्रो सुरु करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली.

Nagpur metro नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचं स्वप्न होत,

गडकरी पुढे म्हणाले की, रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. Broadgauge मेट्रो पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे अशी माहिती ही गडकरी यांनी दिली.