खासदार बाळू धानोरकर यांनी बल्लारपूर येथे केली पुरस्थितीची पाहणी : जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना

संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा

चंद्रपूर (प्रतिनिधी) : आठवड्याभरापासून संततधार पाऊस सर्वत्र पडत आहे. त्यासोबतच इरई व इतर धरणाचे देखील पूर्ण दरवाजे उघडले आहे. त्यामुळे राजुरा- चंद्रपूर मार्ग पूर्ण पणे बंद होऊन संपर्क तुटला आहे. बल्लारपूर येथील ९० घरामध्ये पाणी आले आहे. त्यामुळे शाळा, कार्यालयाला सुट्टी जाहीर करा, शेतीचे, घरांचे पंचनामे तात्काळ करा, माणिकगड, चुनाळा येथे रेल्वेला थांबा द्या, संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करा अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

https://youtu.be/F0ui_9lZ4PU

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार राईचवार, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर देवळीकर, पोलीस निरीक्षक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक देवेंद्र आर्या, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगरसेवक इस्माईल ढाकवाला, माजी नगरसेविका आत्राम, सामाजिक कार्यकर्ते अशोक मत्ते, नरेश मुंधडा, अफसाना सय्यद तसेच जनता विद्यालय येथील कर्मचारी वृंदाची उपस्थिती होती.

आज त्यांनी स्वतः बल्लारपूर येथील विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये तालुक्याचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. त्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होता कामा नये यासाठी प्रशासनाने तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासोबत त्यांनी शहरातील पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच ज्या ठिकाणी पूर पीडित बांधव जनता विद्यालयात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी देखील भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.