पाऊस येताच नागरीकामध्ये भितीचे वातावरण
ब्रम्हपूरी (प्रतिनिधी): वैनगंगा नंदीच्या पाण्यामुळे नेहमीच चारही बाजुने वेढल्या जाणाऱ्या लाडज या गावाचे प्रशासनाने पुनर्वसन करून गावकऱ्याना भितीयुक्त वातावरणातुन बाहेर काढावे अशी मागणी लाडज ग्राम पंचायतचे सदस्य अनिल ढवळे यांनी केले आहे.
https://youtu.be/qr7B3PeMDFY
मागील 3 दिवसापासुन सततधार पाऊस येत असुन लाडज हे वैनगंगा नदीच्या काठावर असल्याने नेहमीच यागावाला पुराचे स्वरूप येत असते, गावकरी आपला जिव मुठीत घेवुन जिवन जगत आहे. यागावाचे पुनर्वसन न केल्यास भविष्यात मोठया प्रमाणावर जिवीतहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००४ व २०१६ या दरम्यान नाव बुडून जिवितहाणी झाल्याचे बोलले जाते. याठिकाणी आरोग्ग्य केंद्र नाही, प्राथमिक शिक्षणाशिवाय शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. येथील नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेती असुन शेती करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह नागरीक करीत आहे. 29 ऑगष्ट ते १ सप्टेंबर २० दरम्यान वैंगानदीला महापूर आल्याने पुराचे पाणी शेतशिवारात आले होते, यामुळे गावाभोवताल असलेली दरड खचली, यावेळी प्रशासनाने रेस्कु ऑपरेशन करून हेलीकॉप्टर व बोटीव्दारे नागरीकांना ब्रम्हपुरी येथे सुरक्षित आणुन ठेवले होते हे विशेष.
यावर्षीही पावसाळा सुरू होताच पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, यामुळे गावकऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, यामुळे गावकऱ्याचे पुनर्वसन करून नागरीकांच्या उदरनिर्वाहासाठी शेती उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी लाडज ग्राम पंचायतचे सदस्य अनिल ढवळे, पंढरी अलोने, पंकज साखरे, अमोल मोहुर्ले, प्रतिक चहांदे व नागरीकांनी केली आहे.