आमदार मुनगंटीवारांकडुन भाजी-फळ विक्रेत्याना जंबो छत्रीचे वाटप

पावसामुळे  विक्रेते झाले होत त्रस्त

मूल (प्रतिनिधी) : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी फळ आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यावर गेल्या काही दिवसापासुन पाऊस येत असल्याने व्यवसाय करणे कठीण झालेले होते, यामुळे अनेक विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला या समस्येवर कायम उपाय काढण्यासाठी क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल येथील फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांना जंबो छत्रीचे वाटप केले, सदर छत्रीमुळे विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मदत होणार असल्याने विक्रेत्यांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन मूल शहराचा न भुतो न भविष्यती अशा बदल झालेला आहे, मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे मंजुर करून पुर्णत्वास नेले. यामुळे मूल शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. प्रत्येक वेळी नागरीकांवर आलेल्या संकटाच्या वेळी आमदार मुनगंटीवार हे धावुन पुढे येत असल्याने नागरीकांच्याही मनात सुधीरभाऊं विषयी प्रेम आहे. उन्हाळाच्या दिवसात विक्रेत्यांना थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जार चे वाटप केले होते, नुकताच तालुक्यात सततधार पावसामुळे अनेकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते, घरात पाणी गेल्याने अन्नधान्याचीही मोठी नुकसान झाली होती, यामुळे आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ कार्यकर्त्यांना पाठवुन अन्नधान्याचे किट वाटप केल्याने आपदग्रस्ताना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान मूल येथील आठवडी बाजारातील भाजीपाला आणि फळ विक्रेत्याना जंबो छत्रीचे वाटप केल्याने विक्रेत्यांनी समाधान मानत आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले.

यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते शैलेंद्रसिंह, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती प्रशांत समर्थ, मिलिंद खोब्रागडे, संजय मारकवार, लीनाताई बददेलवार उपस्थित होते.