सततधार पावसामुळे शेतालगत तलावाची लागली वाट

शेकडो एकर शेत जमीन पाण्याखाली : शेतक ऱ्याचे मोठे नुकसान 
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांला मदतीची अपेक्षा

लोकमत दुधे, सावली
गेल्या आठवड्या भरापासून सततधार पावसाने झोडपल्याने अनेक नदी नाले क्षमतेपेक्षाही अधिक वेगाने आणि दुतर्फा वाहू लागले आहेत पावसाने काही प्रमाणात उसन्त घेतली असली तरी पावसाचा जोर कायम असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे जनजीवन प्रभावित होत आहे नदी नाले क्षमतेपेश्या अधिक वाहत असले तरी पावसामुळे गाव आणि शेती लगत असलेली तलावे आपली क्षमता ओलाडल्याने कित्येक तलावाची वाट लागली असून काही तलाव फुटल्याने सदर तलावाचे पानी नजिकच्या घरात तर शेतात घुसले असल्याची परिस्थिति निर्माण झाली आहे त्यामुळे घराला झरे लागने सोभातच तलावा लगत असलेल्या शेत जमीनी पण्याखाली असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होत आहे

सततच्या पावसाने कहर केल्याने यंदा शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील बोथली येथील सावर बोडी फुटल्याने बोथली, मालपिरजी, हेटी आदि गावा लगत १०० एकर शेत जमीन पण्याखाली तर खेड़ी येथील माराई बोडी फुटल्याने सुजीत दंडावार खेड़ी याचे १६ एकर सोभातच याच बोडी लगत असलेल्या ७५ एकर शेत जमीनी पण्याखाली असल्याने शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेती लगत तलाव फुटल्याने तालुक्यातील यां भागासह इतरही भागातील शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होताना दिसते त्यामुळे शेतक ऱ्याला आर्थिक मदतीची अपेक्ष्या लागली आहे मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसुन येत आहे दरम्यान सावली तालुका भाजपा च्या वतिने भाजप तालुका महामंत्री  सतीश बोमावार यानी पुरग्रस्त आणि नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुण नुकसानग्रस्त लोकांना त्वरित मदत करावी अशी मागणी केली आहे.