अरूण बोडखे यांची कॉंग्रेसच्या राज्य व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड

मूल (प्रतिनिधी) :  येथील मुळचे रहीवासी, नागपूर वरून आपले व्यवसाय आघाडीवर नेणारे तरूण नेते अरूण गजानन बोडखे यांची कॉंग्रेसच्या उद्योग व्यापारी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. उद्योग व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेचा यांनी ही नियुक्ती केली.

अरूण बोडखे हे मूल येथील मुळ रहीवासी असून, येथील प्रख्यात बोडखे रेडिओ सर्व्हीसेसचे गजानन बोडखे, मुख्याध्यापिका करूणा बोडखे यांचे पुत्र आहेत. ते व्यवसायानिमीत्त नागपूर येथे स्थायीक झाले आहेत. कॉंग्रेसची विचारधारा सामान्यात रूजविण्यांकरीता, व्यापारींच्या समस्या सोडविण्यांकरीता पूर्ण राज्यात ते दौरा करतील असे त्यांनी आपल्या नियुक्ती नंतर सांगीतले. उद्योग व्यापार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ती मजबूत राहीली पाहीजे यासाठी प्रयत्न करणार असल्यांचे त्यांनी सांगीतले. नियुक्तीबद्दल त्यांनी कॉंग्रेस नेत्या सोनीया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्योग व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेचा यांचे आभार मानले.