सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार यांच्या मागणीला यश
विसापूर (प्रतिनिधी) : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अपघात विमा काढल्यास विमाधारकांच्या कुटुंबांना तसेच अवलंबितांना आर्थिक व प्रतिकूल परिणाम पासून संरक्षण मिळावे या हेतूने त्यांचा सामूहिक विमा काढण्यात यावा असा ठराव अभाविप चे सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सभेमध्ये मांडला होता. त्या मागणीला यश मिळाले नुकतेच १६ जुलैला विद्यापीठाने त्या मागणीला मंजुरी देऊन सदर अपघाती विमा या सत्रापासून विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावे अशी अधिसूचना काढून त्या बाबत कारवाही करण्याची सूचना महाविद्यालयांना दिली.
महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकीने अथवा चारचाकीने महाविद्यालयात ये – जा करीत असतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रहदार वाढल्यामुळे रस्ते अपघाताची संख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे विमाधारकांच्या कुटुंबांना तसेच अवलंबितांना आर्थिक व प्रतिकूल परिणामापासून संरक्षण मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाची राजीव गांधी अपघात विमा योजना किंवा पंतप्रधान सुरक्षा अपघात विमा योजना किंवा गट विमा अशा सामूहिक विम्या मधून जो विमा विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होईल तो लागू करून त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेऊन सलग्नित महाविद्यालयाकडून अपघात विमा ची रक्कम जमा करण्याबाबत दिशा निर्देश दिले व अधिसूचना काढून लवकरात लवकर रक्कम जमा करण्याची आदेश दिले त्यामुळे आता गोंडवांना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा कवच मिळालेले आहे. ह्या बाबत सिनेट सदस्य दोंतुलवार यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, कुलसचिव डॉक्टर अनिल चिताडे व सर्व सिनेट सदस्यांचे आभार मानले.
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला या पूर्वी कोणती दुर्घटना घडली असता; आर्थिक नुकसान भरपाई मिळत नव्हती. परंतु विद्यापीठाच्या या योजनेमुळे विशेषतः सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार यांनी हा विषय लावून धरल्याने व सिनेट घेतलेल्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांला विमा कवच संरक्षन मिळाले आहे व त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.
डॉ. प्रशांत बोकारे
कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली