अभिनव पिपरे आणि शैलेजा सोनुले यांची नवोदयसाठी निवड

दिलीप मॅकलवार, पोंभुर्णा
पोंभुर्णा पब्लिक स्कुलचा इयत्ता 6 वीचा विद्यार्थी अभिनव नरेंद्र पिपरे आणि जनता विद्यालय पोंभुर्णा येथील शैलेजा लक्ष्मण सोनुले यांची सन 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर तळोधी येथे निवड झालेली आहे.

सदर निवडीबद्दल पोंभुर्णा स्कुल चे संस्थाध्यक्ष रमेशराव सातपुते, जनता विद्यालयचे मुख्याध्यापक अमरसिंग बघेल, प्रीती बच्चुवार, रेखा महाजनवार, प्राची पुण्यपवार, शितल ऊईके आणि शिक्षकवृंदानी अभिनंदन केले आहे.