संध्याताईंना भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचा विसर ; मुल मधिल फलकाने चर्चांना उत

मूल (प्रतिनिधी) : बल्हारपुर विधानसभा क्षेत्राकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचे डोळे लागले असतात. माजी मंत्री तथा आमदार सूधिर मुनगंटीवार यांचे हे क्षेत्र. या क्षेत्रातील तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले आहेत. भाजपाचा राष्ट्रीय नेत्यांचा विसर सध्याताईंना झाला. राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या द्रौपदी मुर्मु यांचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आले .या फलकातून नेत्यांचे फोटो गायब आहेत. मुनगंटीवारांचा आदेश्याने हे घडलं की संध्याताईंना विसर पडला? याची चर्चा आता शहरात होत आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुर्ले रोजी पुर्ण होणार आहे.यामुळे झालेल्या निवडणुकीत ओडिसाच्या कन्या द्रोपदी मुर्मू या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडुन विजयी झाल्या. 21 जुर्ले रोजी विजयी झाल्याचे जाहिर होताच भाजपा पदाधिकार्यांनी जल्लोष साजरा केला. मूल तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाच्या तालुकाध्यक्ष तथा जि.प.चा माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी मूल शहरात अभिनंदनाचा फलक लावला.मात्र या फलकावर केवळ माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो आहेत. मात्र भाजपाचा राष्ट्रीय नेत्यांचे फोटो नाहीत.त्यामुळं भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.