साहित्य हा व्यक्तीच्या अंतर्मनाचा आरसा : अरुण झगडकर
सावली (प्रतिनिधी): तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा केरोडा येथील विषय शिक्षक कवी सुरेश गेडाम यांच्या स्वलिखित ‘‘प्रतिबिंब’’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पंचायत समिती सभागृह सावली येथे .२४ जूलै संपन्न झाले. यावेळी निमंत्रितांचे कवी संम्मेलनही पार पडले.
झाडीबोली साहित्य मंडळ ,चंद्रपूरच्या वतिने आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंढोपंत बोढेकर होते. तर उद्घाटक म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे होते, प्रमुख अतिथी म्हणुन झाडी बोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष कवी अरुण झगडकर, प्रमुख भाष्यकार कवयित्री प्रीती जगझाप बल्लारपूर, रामकृष्ण चनकापुरे सरचिटणीस झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आणि कवी संम्मेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रविण किलनाके जेष्ठ कवी गडचिरोली, जेष्ठ कवयित्री शशिकला गावतूरे मूल आदी मान्यवर उपस्थित होते.
कवि अरूण झगडकर यांनी साहित्यातून अंतर्मनातील भावविश्वाचा विचार प्रतीक आरश्याप्रमाणे प्रकट होत असल्याचे आपल्या निवेदनातून व्यक्त केले.
प्रकाशन सोहळा तथा बहारदार कवी संमेलनात श्रीकांत धोटे, प्रशांत भंडारे, सुनील बावणे, सरिता गव्हारे, छाया टिकले, मनीषा मडावी, मंगला गोंगले, मालती शेमले, किरण चौधरी, दुष्यंत निमकर, गणेश आसेकर, साक्षी राऊत, निधी चौधरी यांनी कविता सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन संतोष मेश्राम व संगिता बांबोळे यांनी केले तर आभार वृन्दा पगडपल्लीवार व लक्ष्मण खोब्रागडे यांनी मानले .