कृषी विभागाच्या बंधाऱ्याजवळील मातीची पार कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान #loss to farmers

आगडी शेतशिवारातील घटना : काही दिवसांपुर्वीच झाले होते काम

खुशाल कुंभरे, जानाळा
शेतकऱ्यांना पिक घेताना सिंचनाची समस्या निर्माण होवु नये यासाठी तालुका कृषी विभागामार्फत आगडी शेतशिवारात बंधाऱ्याचे काम करण्यात आले, सदर काम करीत असताना नैसर्गिक पावसाचे पाणी जाण्यासाठी माती काम करण्यात आले होते, मात्र अतिवृष्टीमुळे मातीची पार फुटल्याने अनेक गरीब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.Big loss to poor farmers

मूल तालुक्यातील आगडी येथे 2 महिण्यापुर्वी कृषी विभागामार्फत बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. सुमारे 12 लाख रूपयाचे अंदाजपत्रक असलेल्या या बंधाऱ्याचे काम मूल येथील एका कंत्राटदारामार्फत करण्यात आले होते. बंधाऱ्याचे काम पुर्ण झाल्यानंतर नैसर्गिक पाणी जाण्यासाठी मातीच्या पारीचे काम करण्यात आले होते, सदर परिसरातुन मोठमोठे वृक्ष असल्याने याठिकाणी जंगलाचे स्वरूप असुन पाण्याचा मोठा फ्लो याठिकाणाहुन वाहत असते, त्यादृष्टीने कंत्राटदारांनी काम करायला पाहिजे होते, मात्र योग्य पध्दतीने काम न केल्याने पहिल्याच पावसात मातीची पार कोसळल्याने शामसुंदर निकोडे, भाऊजी निकोडे, सुधाकर निकोडे, अनिल निकोडे, बाबुराव निकोडे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Farmers’ demand for compensation

नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे करण्यात आले: प्रभारी तालुका कृषी अधिकारी गायकवाड
आगडी येथे कृषी विभागामार्फत बंधारा बांधण्यात आले असुन पारीचेही काम करण्यात आले मात्र मूल तालुक्यात सतत अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे पार कोसळली, यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे सर्व्हे करण्यात आल्याची प्रतिक्रिया मूलचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.