ग्राम पंचायतची बाग ठरतेय नागरिकांचे विरंगुळा केंद्र

आ. वडेट्टीवारांच्या हस्ते नवरगाव येथिल बागेचे उद्घाटन

सिंदेवाही (प्रतिनिधी) :  तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नवरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या खास सुविधा करिता तसेच सायंकाळच्या सुमारास रमणीय विरंगुळाकरिता मुख्य मार्गालगत बागेची निर्मिती केली असून सदर बागेचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य रमाकांत लोधे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, नवरगाव सरपंच राहुल बोडणे, काँग्रेस शहर अध्यक्ष विनोद लोणकर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते दादाजी चंनबनवार, जानकीराम कामडी, सर्फराज पठाण, मधुजी गहाणे, महिला अध्यक्ष चंद्रकला बोडणे, संजय गहाणे, मंगेश मेश्राम , ग्रामपंचायत सदस्य पंकज उईके तथा बहुसंख्य नागरीक व महिला उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शनपर संबोधीत करतांना आ. वडेट्टीवार म्हणाली की, सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे. यामुळे मानवी जीवन हे अतिशय धावपळीचे निर्माण झाले आहे. यात शरीरयष्टी व प्रकृतीची काळजी याकडे दुर्लक्ष केल्यास जात असल्याने आज घडीला मनुष्याला सकाळपासून सुरू होणाऱ्या धावपळीच्या दिनचर्येत सायंकाळचे सुमारास विश्रांतीची नितांत गरज असून याकरिता एखादे एकांत वास अथवा विरंगुळा करिता रमनीय स्थळांची प्रत्येक ग्रामखेडा गरज निर्माण झाली आहे . याच उदांत हेतूने नवरगाव ग्रामपंचायतीने मुख्यमार्गालगत निर्माण केलेली बाग हे कौतुकासपद कार्य असून यामुळे बालगोपालांसह ,तरुण व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. बाग निर्मितीनंतर बागेची स्वच्छता राखणे ही ग्रामपंचायत सह नागरिकांची ही जबाबदारी असून बागेची सुशोभीकरण कायम टिकून राहावे यासाठी नेहमीच प्रत्येकाने प्रयत्नशील असावे असे आव्हाने यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केले. यानंतर बागेची पाहणी करून ग्रामपंचायतच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.