दक्षिण मध्य रेल्वेच्या धडकेत वाघाचे दोन तुकडे#Tiger accident

वन्यजिव प्रेमीमध्ये हळहळ

राजूरा (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्हा हा वाघासाठी प्रसिध्द आहे, वाघाच्या हल्याची घटना नेहमीच होत असतानाच राजुरा तालुक्यातील चनाखा ते विहीरगांव दरम्यान रेल्वेच्या धडकेने वाघाचे दोन तुकडे झाल्याची घटना आज 10 ऑगष्ट रोजी घडली. बल्हारपूर ते काझीपेठ या दक्षिण मध्य रेल्वेनी सदरची घटना घडली असुन सदर घटनेमुळे वन्यजिव प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. Two pieces of tiger in South Central Railway collision

चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुक्यात वन्यजिव मोठया प्रमाणावर आहे. दरम्यान रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे रेल्वे ट्रक तपासणी करीत जात होता. चनाखा ते विहिरगाव मार्गावरील दृश्य बघून तो हादरला. कक्ष क्रमांक 160 मधील रेल्वे रुळालगत वाघ ठार झाल्याचे त्याला दिसून आले. लगेच त्यांने रेल्वे स्टेशन प्रमुखाना घटनेची माहिती दिली. घटनेची माहीती मिळताच राजुरा वनविभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा केला आणि वरिष्ठ वन अधिकार्याना घटनेची माहिती दिली. या रेल्वे मार्गात आतापर्यंत वाघ, अस्वल, चितळ या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. सतत घडणाया घटनेमुळे वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.Rajura taluka of Chandrapur district is rich in wildlife