विषारी सापानी दंश केल्याने युवकाचा मृत्यु#snake bite

दिलीप मॅकलवार, पोंभुर्णा
रात्रौ झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने एका तिस वर्षीय युवकांचा मृत्यु झाल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील जुनगांव येथे घडली. ईश्वर शामराव ठाकुर वय 30 वर्षे असे सर्पदंश केलेल्या युवकाचे नांव आहे. Death of snake bite youth

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे यातच पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव चा तिसऱ्यांदा संपर्क तुटला आहे. रात्री झोपेत असताना जुनगाव येथील ईश्वर शामराव ठाकूर वय ३० वर्ष या तरुणास सापाने दंश केला. काही वेळाने त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला बोलण्यास व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. मात्र नदीला पूर असल्यामुळे गाव सोडून बाहेर कुठेही निघता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करत पहाट होण्याची वाट बघितली. दिवस उजाडताच 10 ऑगस्ट रोजी सकाळी त्याला उपचारासाठी बाहेर काढण्याचे ठरले. परंतु वैनगंगा नदी तुडुंब भरून असल्याने बाहेर उपचारासाठी कसे न्यायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला. कुटुंबीयांनी डोंग्याची व्यवस्था करून त्याला नदी पार करून शासकीय ॲम्बुलन्स मध्ये मुल येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुल येथील डॉक्टरांनी त्याला तपासांती मृत घोषित केले.

सदर दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवरच नव्हे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुराने वेढलेल्या या गावात असे अनेक प्रकार घडू शकतात मात्र प्रशासन या गावाविषयी बेदखल असल्याचे पहावयास मिळत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिवनदास गेडाम यांनी केला आहे. मृतकाच्या कुटुंबीयास तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपा चे युवा नेते राहुल पाल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here