वाघाच्या हल्लात शेतमजुर ठार#tiger attack

 किसाननगर शेतशिवरातील घटना

सुधाकर दुधे, सावली
शेतावरील काम पुर्ण करून परत येत असताना वाटेत बैल धुत असतान दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना हिरापूर शेतशिवरात सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. भक्तदास श्रीरंग झरकर वय 35 वर्षे असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतमजुराचे नांव आहे. Incident in Savali Forest Division, killed in tiger attack

सावली तालुक्यातील हिरापूर येथील भक्तदास श्रीरंग झरकर वय 35 वर्षे, वसंत पिपळखेडे आणि रजत राउत हे तिन शेतमजुर सुरेश भिसे यांच्या श्ेातात रोजीने आवत्याला बाशी मारण्यासाठी गेले होते. बाशीचे काम पुर्ण झाल्यानंतर बैलाना चराईसाठी किसाननगर शेतशिवारा लगत असलेल्या कोंडेखल मायनर लोडी पुलातवळ बैल चारत असताना दोन मोठे वाघ परिसरात दबा धरून बसलेले होते. परिणामी वाघ पाहुन बैल चवताळले त्यामुळे तिन्ही शेतकरी झुडपात लपुन बसले असताना, भक्तदास झरकर यांच्यावर वाघाने हल्ला करून फरकळत नेले, उर्वरित दोन्ही शेतमजुरांनी आरडाओरड केली असता वाघाने घटनास्थळावरून फळ काढला मात्र तोपर्यंत वाघाच्या हल्लात भक्तदास झरकर यांचा जिव गेला. Tiger attack while washing bull

मृत्तकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटनास्थळावर सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर व वनविभागाचे कर्मचारी दाखल होवुन पंचनामा केला.