भाजपा महिला आघाडीच्या वतिने अधिकारी, कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मानले भाजपा महिला आघाडीचे आभार

सावली (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनसेवेत सदैव तत्पर असलेल्या सावली तालुक्यातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, जिबगांव ,प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन पाथरी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथील कर्मचारी वृंद यांना रक्षाबंधन निमित्य राखी बांधण्यात आली.

कामाच्या व्यापामुळे अनेक कर्मचारी बंधू हे आपल्या बहिनीकडून राखी बांधण्यासाठी जावू शकत नाही मात्र भाजपाच्या या बहिणी मात्र आम्हाला राखी बांधून आम्हाला बहिणींचे प्रेम दिले याबद्दल अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी भावना व्यक्त करून सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले.व भाजपा तालुका महिला आघाडी चे संघटनेचे कौतुक केले.

या अभिनव उपक्रमाची सुरुवात जिल्हा भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष तथा सावलीच्या नगरसेविका नीलम सुरमवार यांच्या नेतृत्वात भाजपा महिला तालुकाध्यक्ष पुष्पा शेरकी, शहराध्यक्ष गुड्डी सहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई चिमुरकर, शोभाताई बाबनवाडे, प्रतिभाताई बोबाटे ,छायाताई चकबंडलवार, सिधुताई मराठे, शेवंता बाबनवाडे, रुचिता ठाकूर याचेसह पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.