अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत

माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली मदत

सुधाकर दुधे, सावली
राष्ट्रीय महामार्गावरील किसाननगर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आर्थीक मदत करीत कुटुंबियांचे सात्वन केले.

सावली-गडचिरोली मार्गावरील किसाननगर येथे उभा असलेल्या ट्रकला बेलोरो चारचाकी वाहनाने रात्रौ ११ वाजता दरम्यान धडक दिली. झालेल्या अपघातात विहिरगाव येथील अनुप अजय ताडूरवार आणि पत्नी माहेश्वरी अनुप ताडूरवार यांचा जागिच मृत्यू झाला. यांचेसोबतच सदर अपघातात 2 इसमांचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे. सदर घटनेची माहिती माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना माहित होता त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांचे सात्वन करीत आर्थीक मदत केली.

यावेळी सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे, कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांचेसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.