काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या हस्तक्षेपामुळे अडकले आदिवासी मजुरांचे बिल

वडेट्टीवारांच्या आदेशालाही दिली बगल

सावली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापूर ग्राम पंचायतने सामान्य फंड आणि इतर निधीमधुन अनेक विकासात्मक कामे केली. मात्र सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे यांच्या हस्तक्षेपामुळे दोन वर्षापासून या कामाची बिलेच वटवली नसल्याचा आरोप चक्क काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टद्वारे केला. त्यामुळे काँग्रेसच्या गोत्यात मोठी खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे खुद्द आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्वरित बिले वटवावी असे आदेश दिले असतानाही त्यांच्या आदेशाला तालुकाध्यक्ष जुमनात नसल्याचा आरोपही त्या पोस्टमध्ये काँग्रेस कार्यकर्ते अतुल कोडापे यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सावली तालुक्यातील हिरापूर ग्राम पंचायत अंतर्गत सन 2019-20 या वित्तीय वर्षात सामान्य फंडातुन विहीर तोंडी आणि प्लेटफार्म, दलीत वस्ती निधीमधुन नाली बांधकाम, आणि रस्त्याचे काम करण्यात आले होते. याकाळात प्रशासकाकडे कारभार होता, काम पुर्ण झालेला नसल्याने बिल काढण्यात आला नाही, दरम्यान ग्राम पंचायतवर सरपंच आणि सदस्य निर्वाचीत झाले, सावली तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांची पत्नी प्रिती गोहणे या हिरापूरच्या सरपंच म्हणुन निर्वाचीत झाल्या. काम पुर्ण झाल्यानंतर मजुरांना बिल अदा करणे ग्राम पंचायतचे कर्तव्य आहे मात्र दोन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण होत असतानाही मजुरांना मजुरी देण्यात आलेली नाही, मजुरी मिळावी यासाठी मजुरानी अनेक आंदोलने केली, पंचायत समितीकडे तक्रारही करण्यात आली मात्र कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षाच्या हिटलरशाहीमुळे मजुरांना बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सोशल मिडीयावरून करण्यात आला आहे.

अतुल कोडापे यांनी सोशल मिडीयावर केलेली पोष्ट
याबाबत हिरापूर येथील अतुल कोडापे यांनी सोशल मिडीयावर पोष्ट करून कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी स्वतः करोडो रूपयाचे कामे करीत आहे. मात्र गावातील एखादा आदिवासी कार्यकर्ता लाखाची कामे केली तर त्याचे बिल रोखत असतो, गातातील कोणीही आर्थिक सुदृढ होउ नये यांसाठी ते प्रयत्न करीत असतात. प्रशासक असताना 2 कामे केली, त्यांनतर काही दिवसातच नितीन गोहणे यांची पत्नी सरपंच झाल्या, काम केल्यानंतर बिल देणे गरजेचे होते, परंतु नितीन गोहणे यांच्यामुळे अजुनही बिल अदा करण्यात आलेला नाही, याबाबत युवक कॉंग्रेसचे आशिष यांच्याशी बिलाबाबत बोलण्यात आले, त्यांनी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलले, वडेट्टीवार यांनी गोहणे यांना बिल दया म्हणुन सांगीतले मात्र अजुनही बित काढुन देण्यात आलेल नाही, यामुळे काही दिवसात हिरापूर ग्राम पंचायतच्या कारभारविषयी पंचायत समिती आंदोलन करण्यात येणार असल्याचे अतुल कोडापे यांनी सोशल मिडीयावर टाकलेल्या पोष्ट मध्ये म्हटले आहे

मी कोणतीही ठेकेदारी करीत नाही : नितीन गोहणे
नाली, विहीर तोंडी आणि प्लेटफार्म व रस्त्याचे काम हे प्रशासक असताना झाले, मजुरीची रक्कम तेव्हाच काढायला पाहिजे, सदर काम हे बाहेरगावचे मजुर केले, मी कोणत्याही आदिवासी समाजाच्या नागरीकांना त्रास दिलेला नसुन मी कोणतीही ठेकेदारी करीत नाही, माझेवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया सावली तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.