मूल (प्रतिनिधी) : स्वतःच्या मालकीचे जनावरे चराईसाठी घेवुन गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या राजोली क्षेत्रातील चितेगांव बिटात दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. रविंद्र श्रीरंग गोहणे वय 45 वर्षे असे वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या इसमाचे नांव आहे.tiger attack
मूल तालुक्यातील चितेगाव येथे मोठया प्रमाणावर जंगलव्याप्त परिसर असुन वन्यप्राणीही मोठया प्रमाणावर आहे. शुक्रवारी चितेगांव येथील रविंद्र श्रीरंग गोहणे हे स्वतःच्या मालकीचे जनावरे चराईसाठी चितेगांव बिटातील कक्ष क. 1778 च्या जवळील शेतशिवरात नेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यानी जखमी इसमाला उपचारासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्याालय घेवुन गेले. त्यांच्यावर मूल येथेच प्राथमिक उपचार करून चंद्रपूर पाठविण्यात आले. सदर घटनास्थळाला वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यानी भेट देवुन पंचनामा केला आहे.
तालुक्यात वाघ आणि बिटयाच्या हल्ल्याच्या घटनेत दिवसंेदिवस वाढ होत आहे, काही दिवसांपुर्वी सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडी येथेही गुरे चराईला घेवुन गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला केला होता, त्यानंतर टेकाडी येथीलच इरा कृषी फार्म मधील कुत्र्यावर बिबटयाने हल्ला करून घेवुन गेल्याची घटना ताजी असताना आज चितेगांव येथे वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.