पोळयानिमीत्य शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे बक्षिस वितरण

लोकसहभागातून संस्कृतीचे प्रदर्शन

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वढोली येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बैल पोळा उत्सव समितीच्या वतिने बैल पोळयाचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बैल पोळा निमीत्य लक्की ड्राच्या माध्यमातुन विविध शेतीउपयोगी साहित्य बक्षिस म्हणुन वितरण करण्यात आले.

भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी मुख्य कणा आहे . त्या शेतकऱ्यांच्या बैलाचा सन्मान वाढविणारा हा पोळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . दरवर्षीप्रमाणे यावर्षी सांस्कृतिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या वढोली गावाने एकोपा दाखवीत सांघिक भावनेने पोळा सण मोठ्या उत्साहात पार पाडला.  गेल्या वर्षांच्या परंपरेला बैल पोळा उत्सव समिती वढोलीने विविध कार्यक्रमातून उजळणी दिली . याकरिता सर्व ग्रामस्थांकडून देणगी रूपाने आर्थिक मदत घेऊन लकी ड्रा सारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

बैल पोळ्याच्या दिवशी सर्व बैलजोडी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे कुंकूमतिलक लावून स्वागत करण्यात आले. सर्वांना मानवस्त्र म्हणून दुपटा देण्यात आला . सर्वांची नावनोंदणी करून एकत्रित चिठ्यातून निघालेल्या १५ भाग्यशाली शेतकऱ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले . त्यानंतर झडत्या बोलण्याची स्पर्धा चुरस वाढवणारी ठरली. हर बोला हर हर महादेवच्या गजरात तोरण तोडण्याची मजा आणि बैलाची प्रभातफेरी उपस्थितांच्या उत्साहात भर घालत होती .

यासाठी गावातील सर्व नागरिक व तरुणांनी सहकार्य केल्याचे वढोली येथील रहिवासी सुनील कोहपरे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here