आशा डेव्हिड यांचे निधन

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते डनियल डेव्हिड यांच्या मातोश्री आशा टायटन्स डेव्हिड यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६७ वर्षाच्या होत्या.

त्यांच्या पश्च्यात मुलगा प्रवीण, डनियल, दोन मुली, नातवंडे, सुन व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बल्लारपूर येथील ख्रिश्चन स्म्शानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील गणमान्य मंडळी व ख्रिस्ती समाज बांधवांची उपस्थिती होती.