सुदर्शन गोवर्धन, व्याहाड खुर्द
पहाटे 4 वाजताची वेळ, सर्व गाळ झोपेत असताना अतिदुर्गम भाव असलेल्या कुÚहाडी येथील एका महिलेला अचानक हृदयात त्रास होऊ लागल्याने, ती चक्कर येउन पडली, तिला तात्काळ गडचिरोली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रक्ताची कमतरता असल्याने ओ पॉझेटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सागितल्याने वाघोली येथील चंचल रोहनकर यांनी रक्ताची समस्या काही वेळात दुर केल्याने त्या माऊलीच्या जिवनात नवसंजिवनी मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गडचिरोली जिल्हयातील कुÚहाडी येथील लता मुनघाटे हिला पहाटे 4 वाजता दरम्यान हृदयात त्रास जाणवत होता, काही वेळातच ति चक्कर येवुन पडल्याने तिला गडचिरोली येथील डॉ. कुंभारे यांच्याकडे दाखल करण्यात आले. रूग्णांची स्थिती गंभीर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले, आणि रक्ताची कमतरता असल्याने ओ पॉझेटिव्ह रक्त तात्काळ जमा करण्याचे सांगितले. कुटुंबियांनी आर एस वाय शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथील स्वयंसेवक, वाघोली बुट्टी येथील चंचल रोहनकर यांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गावातील अक्षय चलाख, साजन पेंदोर, राकेश मुनघाटे, दिनेश रोहनकर या यूवकांना घेऊन गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रक्तदान केले. यामुळे त्या माऊलीच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली आणि सामाजिक बांधिलकीचा अनमोल ठेवा जोपासनाच्या यशस्वी प्रयत्न केला.






