मालधक्का स्थलांतरीत करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, नागरीकांचा सुर

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रणनिती सुरू

मूल (प्रतिनिधी) : येथील कर्मविर महाविद्यालयाच्या परिसरात मालधक्काचे काम सुरू करण्यात आले आहे, यामालधक्कामुळे मूल शहरात मोठया प्रमाणावर प्रदुषण वाढणार आहे. शहरात प्रदुषण नको म्हणून मूल येथे मालधक्काला विरोध करून इतरत्र हलविण्याची मागणी मार्निग ग्रुप आणि मूलच्या नागरीकांनी केली आहे. याबाबत नुकतीच विचारमंथन सभा कन्नमवार सभागृहात आयोजीत करण्यात आली, याचर्चेत मालधक्का स्थलांतरीत करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात यावा असा सुर नागरीकांनी व्यक्त केले.

गडचिरोली जिल्हयातील सिंरोचा अहेरी येथील लोहखनिज हायवा ट्रकच्या माध्यमातुन मूल येथे साठवणुक करून रेल्वेतुन इतर राज्यात पाठविण्यासाठी मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणालगत मालधक्काचे काम मोठया धुमधडाक्यात सुरू करण्यात आले होते. मात्र मार्निग ग्रृपच्या सर्तकेतेने मालधक्काचे काम बंद पाडण्यात आले, मूल शहरात मालधक्काचे काम पुर्ण झाल्यास मोठया प्रमाणावर प्रदुषण वाढुन नागरीकांना अपघाताचा सामना करावा लागणार असुन नागरीकांना विविध आजारांना सामोरे जावे लागणार आहेे यामुळे मूल शहरात मालधक्का नकोच यासाठी मागील अनेक महिण्यापासुन मार्निग ग्रुपच्या माध्यमातुन पाठपुरावा सुरू आहे, दरम्यान काम बंद करण्यात आले होते परंतु शुक्रवारपासुन मालधक्काच्या कामाला सुरूवात केल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.

मूल शहरात मालधक्काचे काम करण्यात येवु नये यासाठी जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने येथील कन्नमवार सभागृहात शहरातील नागरीकांची विचारमंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते, सदर सभेत उपस्थितांनी आपआपले विचार मांडले, यासभेत प्रमुख कार्यकर्त्यांची कोअर कमेटी गठीत करण्याबाबत मत व्यक्त करून आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलन तिव्र करण्याच्या दृष्टीने भविष्यात होणाऱ्या मूल नगर पालीकेच्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याबाबतही मत व्यक्त करण्यात आले.

सभेला मूल शहरातील वेगवेगळया संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, राजकीय नेते उपस्थित होते. यासभेचे प्रास्ताविक अॅड. अश्वीन पॉलीकर यांनी केले.