वृक्षतोडीची परवानगी दिली नाही, परंतु प्रक्रिया सुरू : प्रिंयका वेलमे

मूल बचाव संघर्ष समितीचा तिव्र विरोध

मूल (प्रतिनिधी) : रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असलेले वृक्ष तोडण्यासाठी आमचेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, मात्र अजुन तरी परवानगी दिलेली नाही, परंतु परवानगीची प्रक्रिया आमचेकडुन सुरू असल्याची प्रतिक्रिया चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना दिली.

मूल शहरात मालधक्का होवुच नये यासाठी मूल बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातुन वेगवेगळे आंदोलन करण्याची रणनिती आखल्या जात आहे, येथील कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणालगत असलेले साग आणि इतर किसमचे वृक्ष तोंडण्याची प्रक्रिया राबविली जात आहे, यामुळे मूल शहरात प्रदुषणामध्ये मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे, करोडो रूपये खर्च करून शासनाने वृक्ष लागवड मोहीम यशस्वी केली असताना आता रेल्वे प्रशासनाने मालधक्याच्या कामासाठी रेल्वे स्टेशन परिसरात असलेले वृक्ष तोडण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागीतली आहे, वनविभागाने अजुन तरी परवानगी दिली नाही मात्र वृक्ष तोडण्यासाठी आमचेकडे प्रस्ताव आलेला आहे, त्यामुळे आम्हाला वृक्षतोडीची परवानगी दयावीच लागेल असेही चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांनी सांगितले.

‘‘त्या’’ वृक्षांसोबत आमचे भावनीक ऋृणानुबंध : अॅड. अश्वीन पॉलीकर
कर्मविर महाविद्यालयाच्या बाजुला साग आणि इतर किसमचे वृक्ष मोठया प्रमाणावर आहेत, त्याला पाणी टाकुन वाढविण्याचे काम मूलच्या नागरीकांनी केलेले आहे, यामुळे आमच्या भावना त्यावृक्षाशी जोडले आहे. यामुळे सदर वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केल्यास तो आम्ही उधळवुन लावु अशी प्रतिक्रिया अॅड. अश्वीन पॉलीकर यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.