मालधक्काचे काम बंद करण्याचे नामदार मुनगंटीवारांचे रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश

श्रीमती संध्या गुरूनुले, विजय सिध्दावार करणार अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी

मूल (प्रतिनिधी) : सुरजागड येथील कच्चा लोहखनिजाची इतरत्र देशात वाहतुक करण्यासाठी मूल येथील प्रस्तावित मालधक्काचे काम काही दिवसापुर्वी सुरू करण्यात आले होते, मात्र गुड मार्निग वॉक ग्रुपच्या माध्यमातुन ते हाणुन पाडले, सदर आंदोलन तिव्र करण्यासाठी मूल बचाव संघर्ष समिती तयार करण्यात आली, यामध्यमातुनही मोठे आंदोलन करण्यात आले, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोठा मोर्चा काढला आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मालधक्का नकोच म्हणत नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी रेटुन धरली, दरम्यान नामदार मुनगंटीवार यांनी 3 ऑक्टोंबरला नागपूर येथील वनभवनात रेल्वे अधिकारी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, मूल येथील विविध संघटनेच्या कार्यकर्त्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेवुन मालधक्काच्या कामातुन प्रदुषण होणार नाही, सर्वांना मान्य असणाऱ्या जागेवरच तयार करण्यात यावे व मूल येथे सुरू असलेले मालधक्काचे काम बंद करण्याचेे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले, जागेची पाहणी करताना भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष संध्या गुरूनुले आणि मूल शहर बचाव संघर्ष समितीचे विजय सिध्दावार यांना सोबत घेण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

मूल येथे मालधक्का होवु नये यासाठी सर्वप्रथम गुड मार्निग वॉक ग्रुपने पुढाकार घेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, पत्रकार परिषद घेवुन प्रस्तावित मालधक्कामुळे होणारे प्रदुषण, वाहतुक, आरोग्याची समस्यांबाबत शहरात जनजागृती केली, मालधक्काच्या कामासाठी कंपनीमार्फत वृक्षतोड करीत असल्याची बाब गुड मार्निग वॉक ग्रुपच्या सदस्यांना माहित होता, वृक्षतोंड करणाऱ्यांवर गुन्हे सुध्दा दाखल करण्यास भाग पाडले, यामुळे कंपनीने काम बंद ठेवले मात्र 3 महिण्यानंतर परत कामाला सुरूवात करण्यात आल्याने गुड मार्निग वॉक ग्रुपने मूल येथील कन्नमवार सभागृहात मूल येथील नागरीकांची सभा बोलावुन मालधक्कामुळे काय दृष्परीणाम होवु शकतो यावर अॅड. अश्विन पॉलीकर यांनी प्रास्ताविकेतुन आपले मत व्यक्त केले.

यासभेतुन मूल शहर बचाव संघर्ष समिती उदयास आली, दरम्यान समितीच्या माध्यमातुन युवा क्रांती संघटनेच्या युवकांनी पुढाकार घेत मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, त्यानंतर मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या वतिने शाळकरी मुलांचाही मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी जयंती दिनी गुड मॉर्निग वॉक ग्रुपच्या पुढाकारातुन गांधी चौक येथे मुक शांती आंदोलन करण्यात आले, दरम्यान राज्याचे वन, सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत बैठक घेवुन मूल येथील प्रस्तावित मालधक्कयाचे काम सुरू करण्यात येवु नये, सुरू असलेले काम बंद करण्यात यावे, व भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्या गुरूनुले आणि मूल बचाव संघर्ष समितीचे विजय सिध्दावार यांना सोबत घेवुन सर्व अधिकाऱ्यांनी मालधक्का स्थानांतरित करण्यासाठी दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा तसेच नागरिकांच्या तिव्र भावना लक्षात घेवुन मूल शहरातुन अवजड वाहतुक होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी व तसा अहवाल शासनाला सादर करावा अशा सुचना त्यांनी दिल्या

रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक सुर्यवंशी यांनी यावेळी 7 किंवा 8 ऑक्टोबर रोजी जागेची पाहणी करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक गर्ग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक, भाजपा पदाधिकारी, मूल बचाव संघर्ष समितीचे सदस्य, गुड मॉर्निग वॉक ग्रुपचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.