भाजपाच्या बालेकिल्लात कॉंग्रेसची मुसंडी

दोन कॉंग्रेस तर एका ठिकाणी भाजपाचा विजय

मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील तिन ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्यपदाची निवडणुक 16 ऑक्टोंबर रोजी पार पडली. पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (17 ऑक्टों) रोजी प्रशासकीय भवन येथे पार पडली. यानिवडणुकीत कॉंग्रेसनेे दोन तर भाजपाने एक सरपंच निवडुण आणण्यास यशस्वी झाले आहे. सदर निवडणुकीच्या निकालावरून भाजपाच्या बालेकिल्याला खिंडार पडल्याचे दिसून येत आहे.

मूल तालुक्यातील ताडाळा, टोलेवाही आणि भगवानपूर ग्राम पंचायतीची निवडणुक 16 ऑक्टोंबर रोजी पार पडली, या निवडणुकीची मतमोजणी मूल येथील प्रशासकीय भवनामध्ये 17 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. यामध्ये ताडाळाच्या सरपंचपदी राहुल मुरकुटे, टोलेवाहीच्या सरपंचपदी वैशाली निकोडे तर भगवानपूरच्या सरपंचपदी सचिन गरमडे निर्वाचीत झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यानी घोषीत केले. ताडाळा आणि टोलेवाही याठिकाणी कॉंग्रेस तर भगवानपूर येथे भाजपाचे सरपंच निवडुण आले आहे.

मागील 5 वर्षात ताडाळा, टोलेवाही आणी भगवानपूर या गावाचे भाजपाच्या रूपात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यानी नेतृत्व केले होते, मात्र ग्राम पंचायतच्या सरपंचपदासाठी कॉंग्रेसने ताडाळा आणि टोलेवाही यागावात मुसंडी मारल्याने तत्कालीन जिल्हा परिषद, आणि पंचयत समिती सदस्यावर नाराजी तर नव्हती ना अशी चर्चा यानिवडणुकीनिमीत्ताने चर्चेली जात आहे, याक्षेत्राचे नेतृत्व काही वर्षापुर्वी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरूनुले यांनी केले होते हे विशेष.

…..हार जित होत राहते :  संध्याताई गुरूनुले
मूल तालुक्यातील तिन ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्यांची निवडणुक पार पडली यामध्ये भाजपाने भगवानपूर येथील सरपंच आणि सदस्य निवडुण आणले मात्र दोन ग्राम पंचायतचे सरपंच निवडुण आणण्यात अयशस्वी झाले असून निवडणुकीत हार जित होत राहते अशी प्रतिक्रया भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना दिली.