अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात

सावली (प्रतिनिधी) : नवेगाव जलशुध्दीकरण केंद्रावरून परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना हिरापूर/व्याहाड खुर्द जवळील फळरोप वाटीकेजवळ घडली. केशव शिवराम झरकर वय 50 वर्ष रा. हिरापूर असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

सावली तालुक्यातील हिरापूर येथील केशव शिवराम झरकर वय 50 वर्षे हे शनिवार (ता. 12 नोव्हेंबर) रोजी नवेगांव येथील जलशुध्दीकरण केंद्रावर गेला होता, परंत येत असताना चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर येथील फळरोप वाटिकेसमोर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने गंभीर जखमी झाले, जखमी अवस्थेत गडचिरोली येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला.