अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार 2 जखमी

महामार्गावरील घटना

वरोरा (प्रतिनिधी) : दुचाकी वाहनाने चंद्रपूर-नागपूर महामार्गाने जात असताना अज्ञात वाहने दुचाकीला धडक दिल्याने 1 जण जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मजरा यागावाजवळ शनिवारी रात्रोच्या दरम्यान घडली. विश्वास सोनटकके असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नांव आहे तर प्रशांत सोनटक्के व देशमुख नामक व्यक्ती जखमी झाले.

चंद्रपूर-नागपूर या महामार्गावर दुचाकी जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली त्यात गाडीवर स्वार असलेले विश्वास सोनटक्के यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून प्रशांत सोनटक्के व देशमुख नामक युवक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.